अतिवृष्टी मदत GR : ४८० कोटींच्या निधीचे वाटप जाहीर, पण शेतकऱ्यांचा अपेक्षाभंगच?
मुंबई | राज्य शासनाने ऑगस्ट ते सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतीपिकांच्या नुकसानीसाठी ४८० कोटी ५० लाख ३७ हजार रुपये निधीच्या वाटपास मंजुरी दिली आहे. या निर्णयानुसार एकूण ६ लाख ७२ हजार २८८ शेतकऱ्यांना मदत दिली जाणार असून, ५.३७ लाख हेक्टर क्षेत्र या नुकसानीखाली आले आहे.
कोणाला किती मदत?
अमरावती विभाग:
- अकोला जिल्हा:
- बाधित क्षेत्र: १.०६ लाख हेक्टर
- लाभार्थी शेतकरी: १.२० लाख
- निधी: ९१ कोटी १२ लाख
- बुलढाणा जिल्हा:
- बाधित क्षेत्र: ३.३३ लाख हेक्टर
- लाभार्थी शेतकरी: ४.०४ लाख
- निधी: २८९ कोटी २७ लाख
- वाशीम जिल्हा:
- बाधित क्षेत्र: ४० हजार हेक्टर
- लाभार्थी शेतकरी: ४० हजार
- निधी: ३४ कोटी ६४ लाख
छत्रपती संभाजीनगर विभाग:
- जालना जिल्हा:
- बाधित क्षेत्र: ९८६ हेक्टर
- लाभार्थी शेतकरी: १,८२७
- निधी: ८३ लाख
- हिंगोली जिल्हा:
- बाधित क्षेत्र: ५५ हजार हेक्टर
- लाभार्थी शेतकरी: १.०५ लाख
- निधी: ६४ कोटी ६१ लाख
कशाच्या आधारावर मदत?
राज्य शासनाने ही मदत २७ मार्च २०२३ च्या शासन निर्णयानुसार दिली जाणार आहे. NDRF च्या निकषांनुसार ३३% किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाच ही मदत मिळणार आहे. यामध्ये:
- कोरडवाहू पिकांसाठी: ₹८,५००/हे.
- बागायती पिकांसाठी: ₹१७,०००/हे.
- बहुवार्षिक पिकांसाठी: ₹२२,५००/हे.
(मर्यादा: जास्तीत जास्त २ हेक्टरपर्यंत)
शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसकट मदतीचं आश्वासन दिलं होतं, मात्र प्रत्यक्षात एनडीआरएफ निकषांवर आधारितच मदत दिली जाणार आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे संपूर्ण मदत मिळेलच याची शाश्वती नाही.
त्याशिवाय अनेक भागांत अजूनही पंचनामे रखडलेले असून, काही शेतकऱ्यांचा डेटा मदतीच्या यादीतच नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून ३१ हजार कोटींचं पॅकेज देण्यात आल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात तुटपुंज्या मदतीतच शेतकऱ्यांना समाधान मानावं लागत आहे.
राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीवर दिलेली मदत ही एक सकारात्मक पाऊल असली, तरी मदतीचे निकष, मर्यादा आणि रखडलेली पंचनामे पाहता शेतकऱ्यांच्या समस्या अद्याप सुटलेल्या नाहीत. शेतकऱ्यांना भरीव आणि वेळेत मदत मिळेल, अशी अपेक्षा अजूनही अपूर्णच आहे.



